“केसाला जरी धक्का लागला तर…” संभाजी ब्रिगेडचा इशारा!

“केसाला जरी धक्का लागला तर…” संभाजी ब्रिगेडचा इशारा!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत आ.ह. सांळुखे यांची नावे सनातनच्या हिटलिस्टवर असल्याची माहीती पुढं येत आहे. मात्र त्यांच्या जीवीताला काही धोका झाला तर, जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी दिला आहे. 

शिवप्रतिष्ठान आणि सनातनवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारने दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या गांभीर्याने घेतली नाही, असा आरोपही त्यांनी केला. येथे पुरोगाम्यांच्या जीवाला धोका आहे. कर्नाटक पोलीस जर येथे येऊन तपास करत असतील, तर आपलं सरकार काय करतंय, असा सवालही त्यांनी केला. श्रीमंत कोकाटे किंवा इतरांना धक्का लागला तर महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या परीस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. असा इशाराही त्यांनी दिला.

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि पत्राद्वारे श्रीमंत कोकाटे यांच्यासह इतरांना धमक्या येत आहेत. तसेच, कर्नाटक पोलीसांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील काही कार्यकर्ते आणि विचारवंत हिटलिस्टवर आहेत. धमकी आलेल्या आणि हिटलिस्टवर असलेल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संरक्षण पुरवतील. अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली आहे.

 

भांडारकर संस्थेवर हल्ला झाला तेंव्हा विचारांना विचारांनी उत्तर द्यायला हवं, असं म्हणणारे दाभोलकर – पानसरे यांच्या हत्येनंतर कुठे गेले? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version