प्रथमेश आणि मुग्धाचं अखेर ठरलंच

प्रथमेश आणि मुग्धाचं अखेर ठरलंच

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स पर्व पहिलं’ हे आजतागायत प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या मनात घर करून आहे. या पर्वातील आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रावर जणू जादूच केली. आता हे लिट्ल चॅम्प्स मोठे झाले असून सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. दोन वर्षांपूर्वी कार्तिकीनं लग्न केलं, तर रोहीत राऊतनंही गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. दरम्यान आता वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

गायक प्रथमेश लघाटे याने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर सामायिक केली आहे. यात त्याने मुग्धा वैशंपायन सोबत एक रोमॅन्टिक फोटो पोस्ट केलाय. या फोटोवरून या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. प्रथमेश आणि मुग्धा दोघांनीही ही पोस्ट केल्यानं चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.


या फोटोखाली प्रथमेशने “जसे की, तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे! तर अखेर ! आमचं ठरलंय! असे कॅप्शन दिले आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version