अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजुरड्या सरचिटणीसाला अटक

अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजुरड्या सरचिटणीसाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, उरण

 

उरणच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांना बेड्या ठोकण्यात आल्या. प्रशांत पाटीलनं जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अर्थातच जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसंच भर बैठकीत त्यांना अश्लिल शिवीगाळही केली.

 

जेएनपीटीमध्ये नव्यानं चौथं पोर्ट बांधण्यात येत आहे. यासंदर्भात पोर्टचे व्यवस्थापक तसंच सर्वपक्षीय ग्रामस्थांमध्ये आठ दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत प्रशांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तोपर्यंत ठिक होतं. पण त्यानंतर प्रशांत पाटील यांनी कायदाच हातात घेतला.

 

अधिकाऱ्यांवर कागदपत्र भिरकावत त्यांनी धक्काबुक्की केली. तसंच या अधिकाऱ्यांना अश्लिल शिवीगाळही केली. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version