प्रमोद सावंत पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी

प्रमोद सावंत पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी

गोवा विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. गोव्यात भाजपाचा बहुमताने विजय झाला असून गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपाचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा केली आहे. यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह अनके भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्यात मुख्यमंत्रीपदी चुरस रंगली होती. मात्र, आता विश्वजीत राणे यांची नाराजी दूर करत भाजपाने प्रमोद सावंत यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version