जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी मेहतांच्या राजीनाम्याची
मागणी केली. सभागृहाच्या वेलमध्ये उतरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. प्रकाश मेहतांवर घोटाळ्याचे आरोप आहेत.
दरम्यान, प्रकाश मेहता गृहनिर्माण खातं सोडण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर खातं सोडणार असल्याचे मेहता म्हणाले.
चौकशी होईपर्यंत खातं सोडण्यासाठी मेहता यांनी तयार दर्शवली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.