प्रकाश राज यांचा मोदींना टोला

प्रकाश राज यांचा मोदींना टोला

मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अभिनेते प्रकाश राज यांचं नाव आवर्जून घेतलं जात . आपल्या उत्कृष्ट अभिनयासह ते आपल्या बेधडक वक्तव्यसाठी देखील ओळखले जातात. दरम्यान पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्त्यव्य केले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेते प्रकाश राज हे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. दरम्यान ते अनेकदा सरकारवर निशाणा साधताना दिसतात. बऱ्याचदा पंतप्रधान मोदी आणि भाजपा हे त्यांच्या निशाण्यावर असतात. आता पुन्हा एकदा आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. एका ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट हिटलरशी केली आहे. या त्ववेत मध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केलाय त्यात त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. त्याचसोबत या देशाचं भविष्य धोक्यात असल्याचं नमूद केलंय.

प्रकाश राज यांनी ट्विटरवर सामायिक केलेल्या फोटोत त्यांच्यासमोर लहान मुलं दिसत आहेत. तर ही मुलं आणि मोदी यांच्यामध्ये एक काटेरी तार आहे. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी हिटलरचाही फोटो पोस्ट केला आहे.. हिटलरसमोर काही लहान मुलं आहेत आणि त्यांच्या मध्ये काटेरी तार आहे. हा फोटो सामायिक करत ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते.. भविष्य या काटेरी तारांच्या मागे आहे.. आताच सावध व्हा!’ असे लिहिले आहे. या ट्विटमुळे प्रकाश राज यांच्यावर भाजप समर्थकांनी जोरदार टीका केली आहे.

या आधीही प्रकाशराज यांनी मोदींची तुलना हिटलर सोबत केली होती. त्यावेळीही त्यांच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version