‘धोकादायक इमारतीतील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढू’ – प्रकाश मेहता

‘धोकादायक इमारतीतील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढू’ – प्रकाश मेहता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गुरुवारी सकाळी मुंबईच्या भेंडीबाजारातील हुसेन इमारत कोसळल्याने तेथील रहिवाशांचे अतोनात हाल झाले. या दुर्घटनेत 16 मृत्यू आणि 12 जण जखमी झाले आहेत.

गृह निर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी यावेळी भेंडीबाजारात येऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. इमारत दुर्घटनेची नैतिक जबाबदारी सरकारनं स्विकारली आहे,  यापुढे कोणतीही दया माया न

दाखवता धोकादायक इमारतीतील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढू, धोकादायक इमारती रिकाम्या करू असे यावेळी प्रकाश मेहतांनी जय महाराष्ट्रशी बोलतांना स्पष्ट केले. त्यासाठी

मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली जाणारअसल्याचंही मेहता यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version