प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपाची चौकशी केली जाईल- मुख्यमंत्री

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपाची चौकशी केली जाईल- मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी लोकायुक्तांमार्फत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

 

अधिवेशनाच्या शेवटी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ही घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

 

मेहता यांच्या भ्रष्टाचाराची दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. परंतु मुख्यमंत्री त्यांना पदावरुन हटवण्यास तयार नाहीत असे म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version