जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मोठा दबदबा असलेल्या प्रकाश मेहता यांना जबरदस्त धक्का बसला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन प्रकाश मेहतांची उचलबांगडी झाली आहे.
नवे पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची त्यांच्याविरोधात नाराजी होती. या नाराजीमुळेच प्रकाश मेहतांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.