दाऊद अब्राहिम सरेंडर करण्यास तयार होता याची माहिती शरद पवारांना राम जेठलानी यांनी दिली होती. मात्र शरद पवारांनी याबाबतची माहिती कोणालाच सांगितली नाही आणि त्यामुळे दाऊदला पकडण्याची संधी हुकली असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी लावलेल्या आरोपावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकरांना अर्धवट ज्ञान आहे. तसेच राम जेठलानी प्रस्ताव सादर केला.’ मी जर सरेंडर केलं तर मला माझ्या घरी ठेवायचं तसेच माझ्याच घरी चौकशी करावी’ अशी अट दाऊदने प्रस्तावात म्हटलं होतं.
1993 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाचा मोठा मास्टरमाइंड दाऊद आहे.
या बॉम्ब स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला.
राम जेठलानी यांना दाऊद लंडनमध्ये भेटला होता.
त्यानंतर राम जेठलानी यांनी दाऊद सरेंडर करण्यास तयार असल्याचे शरद पवारांना सांगितले.
मात्र त्यांनी दिलेल्या प्रस्तावात दाऊदला त्याच्या घरी ठेवावे तसेच त्याची चौकशी सुद्धा त्याच्या घरीच व्हावी असं म्हटलं होतं.
बॉम्ब स्फोटाचा मास्टरमाइंड दाऊदला तुरुंगात न ठेवता त्याच्या घरी ठेवण्याची अटीवर पोलिसांनी नकार दिला.
त्यामुळे त्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तसेच प्रकाश आंबेडकरांनी तरी या अटींना मान्यता दिली असती का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना उपस्थित केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.