‘केबीसी’ मध्ये ‘बिग बीं’बरोबर खेळणार प्रकाश आमटे!

‘केबीसी’ मध्ये ‘बिग बीं’बरोबर खेळणार प्रकाश आमटे!
‘देविओं और सज्जनो’ असं म्हणत तमाम रसिकांना टीव्हीला खिळवून ठेवणारा शो म्हणजे कौन बनेगा करोडपती… याच खेळात हॉटसीटवरच्या प्रत्येकासाठी खास असलेला संचालक म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहेत. 
 
या शोचं हे यंदाचं अठरावं वर्ष आहे. या दहाव्या सिझनचं वेगळेपण म्हणजे सेटवर ओग्मेंटेड रिअॅलिटी अर्थात व्हर्च्युअल ग्राफिक्स आता पाहायला मिळणार आहे. भारतात अशा प्रकारे ऑग्मेंटेड रिअॅलिटीचा वापर करणारा हा पहिलाच शो असणार आहे. या विषयीची पत्रकार परिषद नुकतीच झाली.त्यावेळी अनेक गोष्टींचा उलगडा झाला. 
 
प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्याबाबत बिग बी प्रभावित –
 
केबीसीमध्ये शुक्रवारी सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही लोक सहभागी होणार आहेत. त्यातल्याच एका भागात प्रकाश आमटे आणि मंदा आमटे सहभागी झाले आहेत. त्यांचं काम पाहून बिग बी थक्क झाले. ‘कसलीही मदत नसताना, एका अनोळख्या ठिकाणी, अनोळख्या भाषेत काम करणं ही सोपी गोष्ट नाही’ असं बिग बींनी यावेळी कबूल केलं. 
 
सामाजिक कामात सहभागी व्हायला आवडेल का ?, असं विचारलं असता, मी गेली काही वर्षे ‘स्वच्छ भारत’, ‘पोलिओ’, ‘टी बी’ यासंदर्भातल्या जाहिराती या सामाजिक कार्याच्याच भावनेतून केल्याचं बच्चन यांनी म्हटलं. टीबी आणि हेपटायटीस बीचा अनुभव आपण स्वतः घेतला आहे. ‘कुली’च्या वेेळेस 1992 ला मला अनेकांनी रक्त दिलं, त्या रक्तातून मला व्हायरस डिटेक्ट झाला आणि त्याचा परिणाम 2000 साली दिसायला लागला. ही आठवणही बिग बींनी यावेळी काढली.. 
 
बिग बींनी फेडलं शेतक-यांचं 1.25 कोटींचं कर्ज
 
त्याच प्रमाणे बिग बीं शेतकरी आत्महत्या आणि सीमेवर शहिद होणा-या जवानांमुळे भावूक होतात. ‘काही वर्षांपूर्वी मी विशाखा पट्टणम आणि विदर्भातल्या शेतक-यांची विदारक स्थिती पाहिली. काही हजारांच्या कर्जासाठी ते आत्महत्या करतात. त्यांची परिस्थिती पाहून मग मी काही करायचं ठरवले आणि त्यावेळी मी 50 कुटुंबाचं कर्ज फेडलं होतं. त्यानंतरही मी माझ्या बँकेकडून कर्जबाजारी 200 शेतकरी कुटुंबांची माहिती मिळवली आणि त्यांचं 1.25 कोटींचं कर्ज हे फेडलं, अश्या प्रकारे मी थेट या गोष्टीत सहभागी होतो, असं बिग बींनी सांगितलं. त्याचप्रमाणे 44 शहिद कुटुंबांनाही काही कोटी हे बिग बींनी मुख्यमंत्री फंडमधून दिले आहेत.
 

आणखी काय काय म्हणाले बिग बी?

– आराध्या सोबत ‘कौन बनेगा करोडपती’ खेळायला आवडेल 
– आमच्या घरात मी सोडून सगळेच सामान्यज्ञानात चांगले आहेत.
– आमच्या घरात विविध भाषा बोलल्या जातात. ज्यात उत्तर भारतीय हिंदी, बंगाली, साऊथ, गुजराती, मराठी या भाषांचा समावेश आहे. 
– नवीन पिढीचे कलाकार हे खूपच स्मार्ट. आलिया भट, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण यांचा आत्मविश्वास पाहून थक्क व्हायला होतं. त्यांचं काम पाहून आपण कुठेच नाही, अशी भीती वाटते.
-पाश्चिमात्य देशांशी आपली तुलना करणं योग्य नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली आहेत. आणि या वर्षात आपण चांगली प्रगती केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version