संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक करा ; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला अल्टीमेटम

संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक करा ; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला अल्टीमेटम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संभाजी भिंडेंना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा विधानभवना घेराव घालू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आझाद मैदानावर केलल्या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय. आरोपी क्रमांक 2 म्हणजेच मिलिंद एकबोटेंना अटक होते तर संभाजी भिडे या आरोपी क्र. 1 ना अटक का होत नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

शिवाय संभाजी भिडेंना पंतप्रधानांची फूस असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी यावेळी केलाय. गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलनाचा इशारा देऊनही सरकारने भिडे यांनी अटक केली नाहीये. म्हणूनच हा एल्गार मोर्चा काढावा लागला, असं म्हणतानाच येत्या 8 दिवसांत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंबेडकरांनी यांनी यावेळी दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version