जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मोर्चाला परवानगी नाकारून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी उद्या मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु या मोर्चासाठी पोलीसांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीये.
मोर्चात काही गोंधळ निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असंही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. सरकारकडून भिडेंच्या अटकेसाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीयेत. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष तयार झालाय, असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
एकीकडे पोलीसांनी राणीची बाग ते आझाद मैदान यादरम्यान होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारलीय. तर दुसरीकडे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मात्र परवानगी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.