डिटेन्शन छावणीत जायचं नसेल, तर #CAA कायद्याला विरोध करा- आंबेडकर

डिटेन्शन छावणीत जायचं नसेल, तर #CAA  कायद्याला विरोध करा- आंबेडकर

धरणं आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर दादरच्या रस्त्यावर खोदादाद सर्कल येथे आंदोलकांना संबोधित करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घणाघाती भाषण केलं. यावेळी केंद्र सरकार आणि भाजपावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले आंबेडकर?

भाजप आणि RSS नेच देशात अराजकता माजवली

NRC, CAA या संदर्भात देशाचे गृहमंत्री खोटे बोलत आहेत.

देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांचा राजीनामा घेतील का, त्यांचं खातं बदलतील का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

#CAA , #NRC कायदा मुसलमानांच्या विरोधात तर आहेच, पण हिंदूंच्याही विरोधात आहे.

हा RSS चा डाव आहे. त्याला संघटीत विरोध व्हायला पाहिजे.

महाराष्ट्रात 16 टक्के लोकांकडे रहिवासी असल्याची कोणतीही कागदपत्रं नाही

आम्हाला वेगळी डफली वाजवावी लागत आहेत, कारण मुसलमान सोडून हिंदूंवर होणाऱ्या अन्यायावर कोणीही बोललं नाही.

जे जे ब्राह्मणशाही विरूध्द लढतात त्यांना छावणीत पाठवण्याचा डाव आहे. त्यामुळे तिथे जायचं नसेल तर सरकारची वाजवायला पाहिजे.

मुंबईत दोन छावण्या उभारण्यात आल्या आहेत. 2 लाख लोक मावतील एवढ्या मोठ्या छावण्या आहेत.

खारगर येथील छावणी अमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या आफ्रिकन आरोपींसाठी असल्याचं सांगतात.

मात्र हे खोटं आहे. मुंबईत 2 लाख आफ्रिकन अस्तित्वात नाहीत.

नेरूळ इथे दुसरी छावणी उभारली आहे. इथे कायद्याच्या विरोधात लढणारे लोक जातील.

#NRC राबवायचा नाही तर छावण्या उभारल्या कशासाठी?

कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे. मात्र आंदोलन सुरू असताना सावरकर मुद्दा उकरून का काढला असा सवालही आंबेडकरांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version