प्राजक्ताचा गृहप्रवेश

प्राजक्ताचा गृहप्रवेश

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच चर्चेत असते. ती ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. ती समाज माध्यमांवर देखील खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतेच एक नवे घर खरेदी केले आहे. प्राजक्ताने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करताना तसेच सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता आपल्या समाज माध्यमांद्वारे नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान तिने नवीन घरात गृहप्रवेश केल्याने तिचे चाहते खुश झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिच्या या घराची वास्तुशांती केली होती.. त्यानंतर घराच्या बांधकामाला सुरुवात झाली . आता हे घर बांधून पूर्ण झाले आहे. आता तिने गृह्प्रवेशाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहायला आली आहे. या घराच्या सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यात प्राजक्ता पूजेचा कलश डोक्याला लावताना दिसतेय. तिच्यावर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version