‘प्रदीप शर्माने केली मनसुखची हत्या’ – एनआयए

‘प्रदीप शर्माने केली मनसुखची हत्या’ – एनआयए

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरण यांच्या ‘कोल्ड ब्लडेड’ हत्येचे मुख्य सूत्रधार होते, असा दावा एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर केला आहे.

एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, या प्रकरणातील इतर आरोपींसह प्रदीप शर्मा यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात विविध बैठकांना हजेरी लावली होती. तसेच जिथे कथित कट रचला गेला. तर त्यासोबतच हिरेनला मारण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी वाझे यांनी शर्म यांना ४५ लाख रुपये दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

एनआयएने प्रदीप शर्मा याचा जमीन अर्ज नाकारत प्रदीप शर्मा निर्दोष नाही आणि त्यांनी गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्ये केली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने याप्रकरणी याचिकेची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version