‘बाहुबली’ प्रभासची कतरिना आणि पूजासोबत रोमॅण्टिक कॉमेडी !

‘बाहुबली’ प्रभासची कतरिना आणि पूजासोबत रोमॅण्टिक कॉमेडी !

‘बाहुबली’ स्टार प्रभास याच्या आगामी चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. ‘साहो’ या आगामी चित्रपटामध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘बाहुबली’ सिनेमाचे दोन्ही भाग पूर्ण होईपर्यंत प्रभासने 5 वर्षांत एकही चित्रपट स्वीकारला नव्हता. आता मात्र ‘साहो’ पाठोपाठ प्रभासने आणकी एका चित्रपटासाठी होकार दिला आहे.

प्रभासचा हा नवा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असून यामध्ये प्रभासबरोबर पूजा हेगडे पाहायला मिळणार आहे. तसंच कतरिना कैफही या सिनेमात प्रभाससोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाला संगीत अमित त्रिवेदी देत आहे. बाहुबलीला चित्रपटाला हिंदीमध्ये मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर साहो हा सिनेमा तेलुगू तामिळबरोबरच हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सुरू झालेला हा नवा चित्रपटही हिंदीमध्ये रीलिज करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

या चित्रपटात प्रभास प्रथमच पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. कतरिना कैफही या सिनेमात प्रभाससोबत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोमान्ससोबतच कॉमेडीचाही तडका या सिनेमात असणार आहे. त्यामुळे प्रभासला कॉमेडी करताना पाहाण्याची संधी त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरले नसले, तरी या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version