राज्यात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्यामुळे राज्यात वीज संकट कोसळण्याची शक्यता असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आह. तसेच केंद्राने कोळसा उपलब्ध करून दिला नाही तर राज्यात वीजसंकट येणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले.
राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळश्याचा साठा शिल्लक आहे. तसेच तीन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने वीज पुरवठ्याची अडचण येण्याची शक्यता आहे. वीज निर्मितीसाठी कोळसा आणि पाण्याचे संकट उभे झाले की, वीज निर्मिती करण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे केंद्राने राज्याल कोळसा उपलब्ध करून देण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज दरवाढीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वीज निर्मिती कंपन्यांकडे २३ दिवसांचा कोळसा शिल्लक हवा, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कोळसा कंपन्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही. नितीन राऊत हतबल झाले आहेत. तिन्ही पक्षांच्या वादामुळे वीज मंडळाचे नुकसान झाले आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनुकले यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी वीज दरवाढ महाविकास आघाडी सरकारने केली आहे. महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसणारा आहे.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.