पवई तलावात घडली थरारक घटना; व्हिडिओ व्हायरल

पवई तलावात घडली थरारक घटना; व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या पवई तलावात थरारक घटना घडली आहे. साहसी तरुणांच्या दक्षतेमुळे पाण्यात वाहून जाणाऱ्या एका तरुणाचा जीव वाचला आहे.

 

पवई तलावात काही युवक पाण्यात खेळत होते. यावेळी त्यांना एक युवक पाण्याच्या प्रवाहात वाहू लागल्याचे निदर्शनास आले. वाहून जाणाऱ्या युवकासोबत असलेल्या

मुलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

 

पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असताना त्या मुलाला झाडाचा आधार मिळाल्यामुळे त्याने फांदीला घट्ट् पकडलं. त्यानंतर तलावाच्या बाजूला असलेल्या भिंतीवरुन दोन

तरुण खाली उतरले आणि बांबुचा आधार देऊन त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

 

एकाने भिंतीवरुन खाली उतरुन अडकेलेल्या तरुणाची सुटका केली. हा सर्व प्रकार घडत असताना तलावाच्या सुरक्षा रक्षकांना या घटनेची कोणतीही माहिती नव्हती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version