कोकणात येणाऱ्यांनो… सावधान!

कोकणात येणाऱ्यांनो… सावधान!

सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच या महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना स्वत:चा जीवही गमवावा लागला आहे. गाडी चालवताना प्रवाशांना खूप मोठी जोखीम पत्करावी लागतेय. मागील अनेक दिवसांपासून या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू होते. मात्र कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसंच खड्डयांमुळे वाहनांचीही हानी होत आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

साधारणतः 500 कि.मी. लांबीच्या मुंबई-गोवा  महामार्गावरून प्रवास  करताना लागणारा वेळ अवघा 8 तासांचा आहे. सद्यस्थितीत मुंबईहून निघालेल्या बसचालकांना या महामार्गावरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कधी टायर पंक्चर होत आहे, तर कधी गाड्यांच्या पाट्या तुटण्यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे प्रवासीदेखील त्रस्त झाले आहेत.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांना तसेच वाहनचालकांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. तर कराड, चिपळूण या मार्गांवरदेखील खड्डे पडल्याने कोकणात येण्यासाठी आता कोणता मार्ग शोधायचा, असा प्रश्न चाकरमान्यांना पडलाय.

 

 

काही दिवसांतच गणेशोत्सवाचं सुरू होणार आहे. त्यामुळे लाखो चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गावाकडे जाण्यास निघतात. अशावेळी खड्डेयुक्त महामार्ग हा त्यांच्या मार्गातील मोठाच अडसर ठरणार आहे. त्यामुळे खड्ड्यांचं संकट टाळण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी आणि मंत्र्यांना रस्ते सुरळीत करण्याची सुबुध्दी मिळावी, हिच अपेक्षा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version