जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रस्त्यांवरील खड्यांमुळे मुंबईकर यंदाही त्रस्त आहेत. मुंबई महापालिकेने यंदा खड्डेमुक्त रस्ते मिळतील असा जो दावा केला होता तो पूर्णतः फोल ठरल्याचे चित्र यंदाही दिसत आहे.
फॉरेन कंपनीकडून रस्ते भरण्यासाठी मटेरियल मागविण्यात आले आहे. मात्र, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले नाही. अशात हे मटेरियल कधी वापरात येईल असा सवाल मुंबईकर करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.