जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
सोमवारी सुरु होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनावर विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातलाय. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणाराय.
कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही 1500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्याला खोटी प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्राला काळिमा फासली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
तसेच कोट्यवधींचा खर्च करून माझं सरकार असल्याची फसवी जाहिरात सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. तर, या पत्रकार परिषदेत बीटीचा नवा अर्थ देखील विखे पाटलांनी सांगितलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.