पोस्ट स्वतःच्या पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत विमा पॉलिसी विकण्याच्या तयारी

पोस्ट स्वतःच्या पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत विमा पॉलिसी विकण्याच्या तयारी

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतीय टपाल सेवा अर्थात पोस्टाने स्वतःच्या पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत विमा पॉलिसी विकण्याची तयारी सुरू केली आहे.

 

त्याचबरोबर पोस्ट बँक म्युच्युअल फंडाच्या योजनाही विकणार आहे.

 

या दोन्ही आर्थिक उत्पादनांच्या विक्रीला पुढील वर्षापासून सुरुवात होणार असल्याची माहिती पोस्टाचे मुख्य कार्यकारी ए. पी. सिंग यांनी दिली.

 

यासाठी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार नाही.  पोस्टाचा ग्रामीण व सुदूर भागाशी असलेला संपर्क लक्षात घेता, सध्या आयडीबीआय बँक, एचएसबीसी, भारतीय स्टेट बँक व एलआयसी यांनी पोस्ट

पेमेंट्स बँकेशी संलग्न होण्यात रस दाखवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version