राज ठाकरेंना केंद्राकडून वाढीव सुरक्षा शक्य

राज ठाकरेंना केंद्राकडून वाढीव सुरक्षा शक्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या राजकारणावरून एक नवा वाद उफळला आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात तसेच ठाण्यतील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. मशिदींवरील भोंगा उतरवण्याचा मुद्दा राज ठाकरेंनी हाती घेतला आहे, यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अनेक संघटनांकडून त्यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्याच्या आधीच त्यांना सुरक्षा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांना समाज माध्यमातून धमकी दिल्याचा दावा पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यानुसार, राज यांच्या सुरक्षेची फेरतपासणी करून नव्या सुरक्षेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेने धमकी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकार आता राज ठाकरे यांना सुरक्षा देऊ शकते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पीएफआय संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत, लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा पीएफआयने मनसेला दिला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना केंद्राकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version