केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणेच फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावेळी बड्या नेत्याचा पत्ता कट होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही अनुभवी नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नरहरी झिरवळ हे दोन प्रकरणांमध्ये चर्चेत आले होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्यासह आणखी काही मंत्र्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता असून त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मुंढे यांची वर्णी लागली होती, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार असून मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याचे समजले जातेय. तर दुसरीकडे सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार आणि अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.
त्यामुळे सुनील शेळकेंना राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार? आणि कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.