भारताच्या पूनम राऊत, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

भारताच्या पूनम राऊत, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

वृत्तसंस्था, दक्षिण आफ्रिका

 

पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा या भारतीय जोडीनं महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला. पूनम आणि दीप्ती या वन डेत तीनशेहून अधिक धावांची भागीदारी रचणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटर्स ठरल्या आहेत.

 

दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी वन डे मालिकेत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूनम आणि दीप्तीनं सलामीला 320 धावांची भागीदारी रचली. त्यात दीप्तीचा वाटा होता 160 चेंडूंमधल्या 188 धावांचा. तिनं 27 चौकार आणि दोन षटकारांची बरसातही केली.

 

महिलांच्या वन डे क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. तर मुंबईकर पूनम राऊतनं रिटायर्ड हर्ट होण्याआधी 109 धावांची खेळी उभारून दीप्तीला छान साथ दिली. पूनमनं 116 चेंडूंमधली खेळी 11 चौकारांनी सजवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version