Pooja Sawant Accident: धक्कादायक! तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतच्या कारचा भीषण अपघात, तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर

या गाड्यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे उपस्थित होते.
Pooja Sawant Accident: धक्कादायक! तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतच्या कारचा भीषण अपघात, तब्येतीबद्दल मोठी अपडेट समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील आगामी ‘कपबशी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मोठी घटना घडली. पुण्याहून सांगलीकडे जात असताना तीन वाहनांचा एकमेकांवर धडकून अपघात झाला. या गाड्यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे उपस्थित होते. सुदैवाने, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 'कपबशी'  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि चित्रपटाची टीम पुण्याहून सांगलीकडे रवाना झाली होती. या प्रवासादरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा – Manjari Fadnis Video Post : 'रक्त येईपर्यंत त्याला मारलं, गोणीत घातलं आणि मोकळ्या जागेत…'; ती घटना सांगताना मंजिरी फडणीस ओक्साबोक्सी रडली 

मात्र, स्थानिकांच्या मदतीने आणि तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, पूजा सावंत, ऋषी मनोहर आणि दर्शन मुसळे हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हेही वाचा – Riteish Deshmukh: थलापती विजयच्या पावलावर पाऊल ठेवत रितेश देशमुखही लढवणार निवडणूक? राजकारणातील एन्ट्रीवर अभिनेत्याने दिलं 'हे' रोखठोक उत्तर 

'कप-बशी' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 5 जून 202 रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला  आहे.या चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे यांसारख्या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version