‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारतात’

‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारतात’

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा होत्या. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु माध्यमांसमोर येत अजित पवार यांनी या सर्व चर्चांवर ब्रेक लावला. त्या सर्व प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे.राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कुठे कुठे कोण कोण डोळे मारत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांना टोला लगावला आहे.

गेल्या 15 दिवसात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरुन वावड्या उठल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानंतरही घडणाऱ्या काही घडामोडींमुळे अजित पवारांच्या चर्चा थांबताना दिसत नाहीये. आता अमृता फडणवीस यांनी अजित पवारांबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, मला वाटते महाराष्ट्र एक असे राज्य आहे जे खूप काही करू शकते. सध्या खूप काही करतही आहे. यासाठी जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकेल असे वाटेल त्यांनी सत्तेत यावे. तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार करावा की, तो फक्त प्रगतीसाठीच काम करणार आहे. स्वतःच्या घरासाठी काम करणार नाही. अमृता फडणवीस पुढे बोलताना म्हणाल्या, राजकारण्यांची अनेकांशी जवळीक असते. अजित पवार भाजपबरोबर येणार की नाही ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती आहे. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कुठे कुठे कोण कोण डोळे मारत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version