खासगी हेरगिरीच्या जाहिरातींबाबत तपासणी करणार – रणजित पाटील

खासगी हेरगिरीच्या जाहिरातींबाबत तपासणी करणार – रणजित पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कुठल्याही व्यक्तीची खासगी माहिती कायद्याने गोळा करता येत नसल्याने खासगी हेरगिरी करण्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत तपासणी करण्याबाबत पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

खासगी गुप्तहेराद्वारे माहिती गोळा करुन ब्लॅकमेलिंग होत असून याबाबत शासनाने कारवाई करण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ व अन्य सदस्यांनी मांडली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version