दलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण

दलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे त्यांनी आता सरकारविरोधी उपोषण करण्याचं ठाम केलं आहे.

आज सकाळी 10पासून राहुल गांधी उपोषणाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 20 मार्चला दिलेल्या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता.या अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version