राम कदम आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेची बॅनरबाजी

राम कदम आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेची बॅनरबाजी

दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आमदार राम कदमांवर सर्वत्र टीका होत आहे. राष्ट्रवादीकडून राम कदम यांच्या घरी मोर्चाही काढण्यात येणार आहे. 

मनसे सुद्धा राम कदम यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे, साधारण सकाळी १०:३० वा. ही आंदोलने करण्यात येणार आहेत. भाजपा आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा मनसेने निषेध केला आहे.

घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या घराबाहेर मनसेने बॅनर लावले तसंच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर मनसेने बॅनर लावले आहे. पोलिसांनी घाटकोपरमधील बॅनर जरी हटवले असले तरी राम कदमांविरोधात मनसेकडून मोर्चा मात्र काढण्यात येणार आहे. तसंच वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्षही राम कदम यांच्या घरी मोर्चा काढणार आहेत. कायदा सुव्यस्था बिघडू नये यासाठी राम कदम यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version