जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. तुमची महत्वाची कागदपत्र किंवा वस्तू हसवल्यास तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याची गरज नाही. पुणे पोलिसांनी एक वेबसाईट लॉन्च केली.
या वेबसाईटवर एखादी वस्तू आणि कागदपत्र गहाळ झाल्यास थेट ऑनलाईन तक्रार दाखल करता येईल. ज्यामुळे पुणेकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या वेबसाईट बद्दल माहिती दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.