जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
लातूरमध्ये खाकी वर्दीतल्या दुचाकी चोराचा पर्दाफाश झालाय. चंद्रसेन देशमुख असे या पोलिसाचे नाव आहे. ते जळकोट पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. चंद्रसेन यांच्या निवासस्थानासमोर आपली चोरीला गेलेली बाईक आहे, असा दावा बाईकचे मूळमालक सुनील पारसेवार यांनी केलाय.
या बाईकची नंबर प्लेट बदलण्यात आलीय. मात्र, चेसिस नंबर तोच असल्याचे पारसेवार यांनी म्हटलंय. आपली बाईक चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी उदगीर पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.