जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी चक्क मध्यरात्री दोन वाजता घेण्याचा आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला होता.
या तुघलकी आदेशामुळे संतप्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांबरोबरच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली.
त्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. मात्र तोपर्यंत हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.