दहीहंडीच्या नियमांवर पोलिसांची कडक नजर

दहीहंडीच्या नियमांवर पोलिसांची कडक नजर

दहीहंडीत सहभाग घेणाऱ्या 14 वर्षाखालील बाळगोपाळांना बंदी घालण्यात आली आहे.

दहीहंडी फोडणाऱ्यांमध्ये 14 वर्षाखालील मुलां-मुलींचा सहभाग आढळल्यास त्या गोविंदा पथकावर आणि आयोजक सगळयांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहे.

 

नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

 

मुंबईत उच्च न्यायालयाने 2014 मध्ये दहीहंडीच्या उंचीवर आणि गोविंदांच्या वयोमर्यादेवर निर्बंध घातले.

दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात केल्यानंतर दहीहंडी किती थरांची लावली पाहीजे यावर कोणतेही बंधन नाही, परंतु दहीहंडीत कोणीही 14 वर्षाखालील मुलं नसावी.

असे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

 

उच्च न्यायालयाने वयोमर्यादेची अट ठेवल्यामुळे मंडळांना आणि आयोजकांना काटेकोरपणे नियम पाळावेच लागणार.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version