‘पोलीस गुप्तवार्ता गोळा करण्यात अपयशी ठरले’ – यशोमती ठाकूर

‘पोलीस गुप्तवार्ता गोळा करण्यात अपयशी ठरले’ – यशोमती ठाकूर

  त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर त्याचे पडसाद म्हणून अमरावती शहरात हिंसाचार घडून आला होता. याच पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीसांनी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमरावतीत शुक्रवारी झालेल्या दंगलीवर यशोमती ठाकूर गप्प का?’ असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. यावर यशोमती ठाकूर यांनी महत्वपूर्ण कबुली दिली आहे.

  फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर यशोमती ठाकूर यांनी कबूली दिली आहे. पोलीस गुप्तवार्ता गोळा करण्यात अपयशी ठरले असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांच्या या अपयशावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

  अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले आहेत. तसेच त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावरही सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन अमरावतीमध्ये अशांतता माजवू नये अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अमरावतीमध्ये शनिवीर घडलेली घटना शुक्रवारच्या घटनेपेक्षा जास्त निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रझा अकादमीच्या हिंसाचारापेक्षा प्रतिक्रिया देणे निंदनीय असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version