आमदार आव्हाड यांच्याविरोधात पोलीस तक्रार

आमदार आव्हाड यांच्याविरोधात पोलीस तक्रार

‘दी केरला स्टोरी’ चित्रटपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तर बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. महाराष्ट्रात दी केरला स्टोरी चित्रपटावरून नवं राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवला आहे. दी केरला स्टोरी हा चित्रपट केरळला बदनाम करणारा असून चित्रपटाच्य निर्मात्याला फाशी द्या, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी देण्याचे विधान आव्हाडांना चांगलच भोवणार आहे. निर्मात्याला फाशी देण्याचं भाष्य केल्यामुळे ठाणे भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तसेच, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांच्या सडक्या विचारांना फाशी दिली पाहिजे, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

आव्हाड काय म्हणाले?

‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटात ३२ हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. आव्हाडांनी दावा केला की, चित्रपटाचे निर्माते हे स्वत: न्यायालयाला सांगतात की, ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. तसेच देशाची बदनामी करणाऱ्या दी केरला स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्या, असे आव्हाड म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version