पोलिसांनी गाठला सुतावरुन स्वर्ग

पोलिसांनी गाठला सुतावरुन स्वर्ग

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

वेगवेगळ्या औषधांच्या माध्यमातून नशा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसोंदिवस वाढतच चाललंय. सरकारनं या प्रकारच्या अनेक औषधांची विक्री बंद पाड़लीय.

तर, काही औषधं डॉक्टरांच्या पत्राशिवाय द्यायची नाहीत असा नियमही बनवलाय. मात्र, तरीसुद्धा या औषधांची ऑनलाईन विक्री सुरु आहे.

अशाच एका टोळीला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केलंय. दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीनं ही औषधं विकली जातायेत.

पोलिसाच्याच गाडीतून चोरी करणाऱ्या एका लहान मुलाला पोलिसांनी अटक केली. त्यानं नशेची औषधी विकत घेण्यासाठी चोरी केल्याचं सांगितले आणि त्यातून पोलिसांनी धागेदोरे पकडत संपूर्ण रँकेटच उद्धवस्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version