आमदार संजय शिरसाटांना पोलिसांची क्लीन चिट

आमदार संजय शिरसाटांना पोलिसांची क्लीन चिट

आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आहेत. “मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढलंय. देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील, त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत, असं अंधारे म्हणाल्या.

त्यानंतर त्या असाही म्हणाल्या आमदाराच्या प्रकरणात पोलिसांनी क्लीन चिट कशी दिली? एसआयटी चौकशीचे काय झाले. त्याचे अधिकारी कोण, याची मला माहिती नाही. चौकशी एकतर्फी झाली का? माझी बाजू ऐकून घेण्यात आली नाही. बाजू मांडायची संधी दिली नाही. गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे. आयोगाकडे अहवाल जाण्याआधी तो सार्वजनिक कसा होतो. असे अनेक प्रश्न अंधारे यांनी विचारला आहे. मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार, असं सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version