अंबरनाथ रेल्वे पोलिसावर जीवघेणा हल्ला

अंबरनाथ रेल्वे पोलिसावर जीवघेणा हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार दिंवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथमध्ये रेल्वे पोलिसावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुधीर कांबळे असं या पोलीस हवलदाराचं नाव आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.

 

या हल्ल्यात कांबळे गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 8 ते 9 अनोखळी समाजकंटकांनी हा हल्ला केल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version