‘पोलिसांनी नियमबाह्य प्रश्न विचारले’ – प्रवीण दरेकर

‘पोलिसांनी नियमबाह्य प्रश्न विचारले’ – प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांची मुंबै बँक प्रकरणी पोलिसांकडून तीन तास चौकशी झाली. माता रमाबाई आंबोडकर पोलीस ठाण्यात दरेकरांची चौकशी झाली. दरम्यान, ‘पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिले असून पोलिसांवर सरकारचा दबाव असून अनेक प्रश्न नियमबाह्य होते’, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

चौकशी झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर म्हणाले, सभासद म्हणून बँकेकडून काही लाभ घेतला का, असे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली आहेत. तसेच तेच तेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी विचारलेले अनेक प्रश्न हे नियमबाह्य असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले, हा गुन्हा एका संस्थेपुरताच मर्यादित असून इतर संस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक आणि इतर विषयासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही दरेकर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्यावतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version