Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा? वाघोली ते शिक्रापूरमध्ये कोणते बदल? PMRDAने सादर केला ‘हा’ प्लॅन

पुण्यात वाढत्या वाहतूक कोंडीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक संस्थांना 5 डिसेंबरपर्यंत निर्देश दिले आहेत.
Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा? वाघोली ते शिक्रापूरमध्ये कोणते बदल? PMRDAने सादर केला ‘हा’ प्लॅन

पुण्यात वाढत्या वाहतूक कोंडीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक संस्थांना 5 डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्कुर्डी येथे PMRDA मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीत महसूल, पोलीस, एमआयडीसी, हायवे प्राधिकरण, मेट्रो आणि स्थानिक प्रतिनिधी यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हिंजवडी, वाघोली आणि शिक्रापूर यांसारख्या इतर वाहतूक कोंडीच्या भागांमध्ये एक सविस्तर आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

यात वाघोली ते शिक्रापूरमधील 30 मीटर रुंदीच्या समांतर रस्त्याचे काम सुरू असून जमीन संपादन आणि विकास प्रक्रिया सुरू आहेत. याचा फायदा विशेषत: शिक्रापूरमधील व्यस्त चौकांवरील कोंडी कमी करण्यासाठी हे मार्ग उपयोगी ठरणार आहेत. तसेच यावेळी नव्या रस्त्यांच्या बांधकामासह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उड्डाणपूल व एलिव्हेटेड कॉरिडॉर विकसित तसेच सध्याच्या रस्त्यांचे रुंदीकर इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा- Hsrp Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी अपडेट! HSRP नंबरप्लेटची मुदत पुन्हा वाढवली

यामुळ या गर्दीच्या भागातून प्रवास करणाऱ्या रहिवासी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवासात सोपा होणार आहे. त्याचसोबत नव्या ट्रॅफिक सिग्नल्स व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर वाढवण्यात येणार असून भारी वाहनांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.  कोणत्याही अपघाताच्या वेळी चालक, वाहन मालक आणि कंत्राटदार यांची संयुक्त जबाबदारी निश्चित केली जाईल. अधिकाऱ्यांच असं म्हणण आहे की, या उपाययोजनांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल आणि सुरक्षित, कार्यक्षम प्रवासाला चालना मिळेल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version