तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर PMPML च्या 158 अधिकाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर  PMPML च्या 158 अधिकाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

PMPML चे माजी अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी विविध कारणांनी घेतलेले 158 अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.

कारण, PMPML च्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निलंबन रद्द करण्याचा ठराव मंजूर झालाय.

कामात हलगर्जीपणा करणं, शिस्त न पाळणं आणि पूर्वसूनचा न देता गैरहजर राहणं, अशा विविध कारणांखाली 158 कर्मचारी कामावरून बडतर्फ करण्यात आले होते.

मात्र, हा ठराव मान्य झाल्याने मुंडे यांच्या उद्देशालाच सुरुंग लागणार हे नक्की शिवाय पहिले पाढे पंचावन्न झाले तर PMPML चा प्रवास आणखी खडतर असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version