‘या’ बँकेवर RBI चे 6 महिन्यांसाठी निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट!

‘या’ बँकेवर RBI चे 6 महिन्यांसाठी निर्बंध, खातेदारांमध्ये घबराट!

मुंबईतील येथे असलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर आरबीआयने सहा महिन्यांंसाठी आर्थिक निर्बंध लादला आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या सायन शाखेबाहेर खाते धारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून नालासोपारा येथील शाखा अचानक बंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खाते धारकांना तीन महिन्यात 1000 रुपये काढता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बॅंका उत्तर देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण परसले आहे.

नेमकं काय घडलं ?

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर आरबीआयने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादला आहे.

पीएमसी बॅंकेवर बॅंकिंग नियमन कायदा 35 अ अंतर्गत कारवाई केली आहे.

त्यामुळे नवीन कर्ज देणे तसेच ठेवी स्वीकारण्यासह गोष्टींवर निर्बंध असणार आहे.

तसेच आरबीआयच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देऊ शकणार नाही तसेच कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही.

बॅंकेवर हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असणार असून प्रत्येक माहिती ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version