वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीत परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतलीये. 11 डिसेंबरला इटलीच्या टस्कनी येथील एका खासगी समारंभात विवाह केल्यानंतर हे नवं जोडपं स्वदेशी परतलंय.
यावेळी विरुष्कानं पंतप्रधानां मोदींना रिसेप्शनसाठी आमंत्रित केलंय. नरेंद्र मोदींनीही विराट आणि अनुष्काला त्यांच्या लग्नाबद्दल अभिनंदन केलंय.
यावेळी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटरवरुन याबाबत ट्विटही करण्यात आलंय. दरम्यान विराट आणि अनुष्का हे 21 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या हॉटेल ताज पॅलेस येथे लग्नाची खास मेजवानी देणार आहेत. त्यानंतर 26 डिसेंबरला मुंबईतही असाच एक भव्य समारंभ आयोजित केला जाणारेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.