चक्क देशाचे पंतप्रधानचं बसणार उपोषणाला

चक्क देशाचे पंतप्रधानचं बसणार उपोषणाला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

विरोधक गदारोळ घालून सातत्याने संसदेची कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. १२ एप्रिल रोजी दिल्लीतील राजघाटावर ते लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणात पंतप्रधानांसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे सर्व खासदारही सहभागी होणार आहेत.

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण आंदोलन असल्याचे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार उपोषण करणार असल्याने दिल्लीतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version