नवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरुवात

नवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाची सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन आणि जेएनपीटीच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या कार्यक्रमाचा चांगला योग असल्याचंही मोदी म्हणालेत. तसेच सरकारची सुमद्र किनाऱ्यांचा वापर वाढवण्याची योजना असून सागरिक ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखली होती असं वक्तव्य मोदींनी केेले.

नितीन गडकरींच्या नेतृत्वात भारताच्या पॉवर सेक्टरला नवी चालना मिळाली असल्याचंही मोदी म्हणालेत. आधीच्या सरकारनं कामं केली नाही. लटकना, अटकाना, पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण असल्याची टीका देखील मोदींनी काँग्रेसवर केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version