पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. तसेच पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. हे विद्यार्थी वाराणसीसह उत्तर प्रदेशातील इतर भागांतील होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी प्रचार करत हेत. यादरम्यान, पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी वाराणसी आणि उत्तर प्रदेशातील इतर भागातील होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपले अनुभव सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या वैद्यकीय शिक्षणावरही भाष्य केले. देशाचे वैद्यकीय शिक्षणाचे धोरण धड असते तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची गरज भासली नसती. त्यामुळे देशाचे धोरण चुकल्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात आहेत, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू असून युक्रेनमध्ये तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, युक्रेनमध्ये अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकार ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत अनेक भारतीयांना परत आणण्यात येत आहे. तसेच भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसा, आतापर्यंत १७ हजार भारतीयांनी युक्रेन सोडले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.