PM Gharkul Yojana लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाकडून नवीन निधी वितरणाला मंजुरी, कधी मिळणार पैसे?

PM Gharkul Yojana लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!  शासनाकडून नवीन निधी वितरणाला मंजुरी, कधी मिळणार पैसे?

 ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडूनअंतर्गत ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’  राबवली जात आहे. आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी साधारणपणे 1 लाख 20 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मोठ्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.  एकूण 10 हजार कोटी रुपयांचा निधी घरकुल योजनेसाठी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नवीन शासन निर्णयानंतर आता उर्वरित हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा केल्याचे प्रमाणपत्र शासनाकडे सादर करणेही संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

शासन निर्णयात निधीच्या वापराबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी केवळ घरकुल योजनेसाठीच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते प्रलंबित असल्याने बांधकामे रखडली होती. मात्र आता शासनाने नवीन निधी वितरणाला मंजुरी दिल्याने थकीत हप्त्यांचा निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version