पंतप्रधान मोदींसह भाजप खासदारांचं उपोषण

पंतप्रधान मोदींसह भाजप खासदारांचं उपोषण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते एक दिवसीय उपोषण करणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान उपोषण करत आहेत. रोजचं कामकाज सुरू ठेवून पंतप्रधान मोदी उपोषण करणार आहेत.

ज्यांनी लोकशाहीची गळचेपी करण्याचा गुन्हा केला, राजकीय अहंकार आणि सत्तेच्या भुकेपोटी देशाचा विकास होऊ दिला नाही, संसदेचे कामकाज चालू दिले नाही, अशा मूठभर लोकांची मानसिकता देशाच्या जनतेपुढे उघड करण्यासाठी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते देशभर उपवास करतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version